Saturday, July 19, 2025
मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल - म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल - परंतु तुमच्या आजुबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करत नाहीत, असे तुम्हाला वाटू शकेल, पण संयम घालवू नका. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात.