Friday, July 11, 2025
इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. - तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. मुलं आणि ज्येष्ठांची त्यांच्याकडे अधिक लक्ष पुरविण्याबाबत अपेक्षा राहतील. प्रणयराधन करण्याच्या चाली फळणार नाहीत. आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा.