Monday, November 2, 2026
भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. नातेवाईकांमुळे तुम्ही काहीसे त्रस्त व्हाल. परिस्थिती हाताळण्यासाठी शांतपणे राहून पावले उचला. घाईघाईत, तडकाफडकी निर्णय घेतला तर महागात पडू शकते. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही.